Saturday, June 18, 2016

बाबा

बाबा

खरच बाबा म्हणजे घराचा पाया
ज्यांच्या मनात साठलेली असते आई एवढीच माया

प्रतेकजण सारखा कसा राहील
जो तो आपापले प्रेम व्यक्तच कसे करील
सगळे सारखे असता वेगळेपण कसे राहील
म्हणून तर देवाने सर्वांना वेगवेगळ्या साच्यात बनविल

बाबा प्रत्येक गोष्ट सांगत नसतात
ते सतत आपल्या कामात असतात
त्यांच म्हणन की   सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात 
म्हणून तर काही वाईट वाटल की  ते फक्त शांत बसून राहतात

सतत असते त्यांना घराची काळजी
गुंतलेले असतात जमा करण्यात जन्माची पुंजी
कधी लक्षही देत नाहीत की त्यांची कपडे होतायत खूजी
नेहमी हसत मुखाणे प्रत्येकाच्या कामाल होतात राजी

कठोर, कर्तृत्वं, दयाळू असतात ते बाबाच
अन् संकटात आपल्याला आठवतात ते बाबाच
प्रत्येक अडचण स्वत:ची समजुण धावतात ते बाबच
म्हणून तर आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार हे बाबाच

               - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2009 [वय वर्षे-19]

Friday, June 17, 2016

तुम्हारा साथ


तुम्हारा साथ

आज के इस खास दिन कुछ कहना चाहती हू तुमसे
क्योंकि इसी दिन हम जुड़ गये थे दिल से

पहेली नज़र मे ही लगा था की तुमही हो मेरे साथी
और आज मै यही कहूँगी की तुमही हो मेरे महारथी

लगता नही की इतने दीनो से हम साथ है
क्योंकी आज भी तुममे वही पहेली वाली महेक है

तुम्हे अंदाज़ा भी नही की हम तुमपे कितना मरते है
ज़रूरत पड़े तो तुमपे जान छिड़कने के लिए भी तयार है

जी करता है की हरपल  तुम्हारे साथ रहू
और दुनिया के सारे सुख तुमपे निछावर करु

मूज़े तुमसे कुछ भी शीकायत नही
क्योंकि ऐसा कुछ भी नही जो तुमने मुझे दिया नही

 अब जिंदगी मे मुझे और कुछ नई चाहिए
 बस यूँही हर पल मेरे साथ रहिए

                             कविता लिहिलेला दिनांक - २९-०१-२०१६
                                                        [एका मैत्रीणीसाथी तिच्यालग्नाच्या वाढदिवसाला म्हनून लिहुन   दिलेली ]

Sunday, June 12, 2016

पाऊस

पाऊस

तुला माहितीये लहानपणी फिरायला जाताना तू वाटायचास नकोसा
पण पुन्हा कळाल तूच तर देतोस जगाला दिलासा

तुझ्याविना फूल नाही पान नाही काहीच नाही
तू पहिल्यांदा येतोस तेव्हा अंगाची करतोस लाही लाही
पण पुन्हा देतोस शेतकर्यांच्या यशाची ग्वाही
त्यामुळेच तर त्यांच्या घरी सुख-सम्रुधि वाही

कधी कधी अपेक्षेपेक्षा अधिक पडतोस अफाट
मग शेतातली सगळी पिके करतोस सपाट
कधी कधी जून जूलै पर्यंत पाहायला लावतोस वाट
आणि जमीन अगदी होते कोरडी फकाट

तुझमुळे सगळी रस्ते भरतात तुडुंब
पण आमच्या पोटात मात्र फुटतो आटम बॉम्ब
कारण त्यामुळे शाळेत जायची होते बॉम्बाबोंब
म्हणून तर म्हणते ना तू ये आता ताबडतोब

तू कधी काय घेऊन  येशील सांगता येत नाही
कधी सुख तर कधी दु:ख पण रिकामी हाती येणार नाही
हेच तुझे वेशिष्ट्य हो की नाही
आता सगळे तुझी वाट पाहतात मग सांग तू येणार का नाही

                         - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2007 [वय वर्षे-१७]


Sunday, April 24, 2016

स्वप्न माझ

स्वप्न माझ 


अजूनही अस वाटत की स्वप्नात आहे मी
जेव्हा स्वत:ला पाहते आरश्यात मी

वाटल नव्हत कधी की तू होशील माझा
अन्  बहरेल संसार तुझा मझा

आज वर्ष पूर्ण झालाय आपल्या लग्नाला
पण  भासते असे की तू कालच तर भेटला मला 

तू नेहमी आपल्याबाबतीत होतास सकारात्मक
पण माझी आपली सतत कॅसेट नकारात्मक

शेवटी मी हारले आणि आपण जिंकलो
सगळ मागे सोडून आपण पुढे निघालो

स्वप्न पूर्ण झाल माझ तूझ्या हातून लाईसन्स घालायच
आणि तुझी बायको म्हणून घेऊन जगभर मिरवण्याच

देव असेल तर आज एकच मागन माझ
की प्रत्येक जन्मी हेच खूळ होऊ दे माझ 

                                                         कविता लिहिलेला दिनांक - १५-०४-२०१६
                                                        [on occasion of first marriage anniversary]

Friday, April 8, 2016

तुझ बोलन

तुझ बोलन

लोकांशी अगदी नीट वागायच
आपल म्हणून गल्याला पडायाच
आपल्या घरच्यांशी मात्र कसही वागायच
थोड  काही म्हटल म्हणून रुसून बसायच
म्हणून तर म्हणतात शेवटी घरच ते घरचच

भ्रम असतो की लोकांशी नीट वागल की ते नाव घेतात
पण घरच्यांशी कसाही वागा शेवटी ते माफ करतात
एक हे की लोकांकडून भेटतो तो खोट्या प्रेमाचा मारा
आपल्यांकडून भेटतो तो कळकळीच्या प्रेमाचा मारा
शेवटी हाच तर असतो दोघंतला खरा दूरा

दुरून पाहिलेल क्षितिज नेहमी सुंदरच वाटत
तस तर नाही ना वाटत आपल्याला लोकंबाबत
नाही दिसत घरच्यांची तळमळ प्रेम
पण लोकांची दिसती ती खोटी आशा खोटे गम
म्हणून तर म्हणतात दुरून डोंगर साजरच वाटत

आपले सांगतात ती वाटते कीटकीट
मित्र मैत्रिणी लोक सांगतात ते चांगलअसो वा वाईट
वळण बिघडवणार असो वा चुकवणार वाट पण वाटते ती आपली वाट
आणि घरच्यांच चांगल, वाटत खोट नाट
पण शेवटी ज्याची निवड त्यावरूनच ठरते आयुष्याची वाट

                                                          -  कविता लिहिलेला  दिनांक - १३-12-२००६[वय वर्षे-१७]


Saturday, February 27, 2016

वेळ

वेळ
प्रथम तुला समजता न कळले तुझे महत्व
फक्त ऐकले होते मी सर्वांकडून तुझ्या जीवनाचे तत्व

सगळे वागतात अगदी तुझ्या नियमाने
जो तो प्रयत्न करतो आपापल्या परीने
जो चुकतो तो विसरतो आपली भाणे
आन् जो पाळतो तो राहतो सन्मानाने

किती  आहेस ग तू नियम.बद्ध
कधीच नसतेस तू बेशुद्ध
तू म्हणजे सगळ्यांचा कटीबंद्ध
खरच तुझ्यामुळे बणलो आम्ही शिस्तबद्ध

तुझ्यामुळे वाढते जीवन जगण्याची तळमळ
असते सतत काहीतरी करून दाखवण्याची मरमर
सादांकडा सर्वांच्या पुढे जाण्याची मरमर
अन् उंच झेंडा झळकवण्याची तळमळ

तू आहेस म्हणून आम्ही आहोत एका बंधनात
नाही तर सगळेच नाचले असते आपापल्या तालात
कुणी कुणाला मानल नसत 
अन् जग झाल असत अगदी अस्ताव्यस्त


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

माणुसकी

माणुसकी

आज माणुसकी राहलीय का कुणाला
सगळे विचारतात ते फक्त कामाला

हे अस वागण का कशासाठी? कळत नाही मला
अहो मागेपुढे पाहतात साधे बोलण्याला हसण्याला
कधी वाटत दिवसाबरोबर बदल असावाच लागतो का माणुसकीला
अस करून काय मिळत ते माहीत त्याच माणसाला

मैत्री मैत्री राहिली नाही
नात नात राहील नाही
असे सम्बधच आता का हे कळत नाही
आणि यामुळेच माणूस माणूस राहिला नाही

त्याला त्रास होतो ना माग होऊ देत
इथे कुणाच्या कुणाच काय जात
जवळ या जर चालत असेल माझ भात
नाहीतर व्हायच आपापल्या वाटेनी चालत

हा येतो तो येतो नाव ठेवतो एकमेकांना 
पण तुझ्यात बघ तोच .तर तू नाहीस ना
लक्षात ठेव माणसा आपण एकटचे असतो येताना अन् जाताना
त्यामुळेच तर माणुसाकीने वागावे जीवन जगताना   


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९