Thursday, January 28, 2016

लहानपण

लहानपण


लहानपनीचे दिवसच ते चंदेरी
आठवले की जग होते सोनेरी

होतेच ते क्षण मौज मस्तीचे
बसल्या बसल्या खोड्या करण्याचे
आणि मग पाठीत धपाटे खाण्याचे
नंतर कोपर्‍यात रुसून बसण्याचे

आवडायच तासन् तास  मातीत बसायला
त्यापासून काहीतरी बणवून लागायच खेळायला
पण मधेच कुणीतरी विलण यायचा खेळ मोडायला
कारण पाउस  तयारच असायचा कधीही पडायला

रडत रडत आईचा हात धरून जायच शालेला
पण डोळे मात्र सादानकदा शाळेच्या घंटीला 
कधी एकदा वाजते आणि मी होते मोकळी खेळायला
कारण अभ्यासाचा सगळा लोड दिला होता आईला

सुट्ट्या लागल्या की जायच कुठेही फियायला
मनसोक्त मोकळ्या जगात हिंडायाला
वाटलही नव्हत की मोठे झल्यावर इतके काटे असतात जीवनाला
खरचं लहानपण ते लहानपण दृष्ट न लागो त्या वयाला


                                                                  कविता लिहिलेला  दिनांक - १८-०६-२००७ [वय वर्षे-१७]

2 comments: