जीवन
जीवन म्हणजे एक संघर्षच नवे का?
जिथे फाटेल तिथे घालायचा टाका
जबाबदारी,तडजोडी हीच ना व्याख्या जीवनाची
यात सदा न कदा वाट पाहावी लागते सुखाची
कधी क्षणं दु:खाची तर कधी आनंदाची
पण हिंमत ठेवायची ती सुखदु:खाना सामोरे जायची
खरं सांगू हा तर जणू खेळच असतो डोंबार्याचा
ज्यात प्रत्येकजण प्रयत्न करतो दोरीवारुन चालण्याचा
जो सावधनगिरीने पार करतो तोच विजेता या खेळाचा
खरा हाच तर तो असतो क्षण मजेचा
ही परीक्षा असते तेथे वडीलधारे येतात मदत करायला
त्यात शिकायच असत ते एकमेकांना सावरायला
आणि सज्ज व्हायच असत जीवन फुलवायला
म्हणून तर तो नंतर तोंड देऊ शकतो जगाला
संकटे येतात संकटे जातात घाबरायच नसत कधी त्याला
कारण ते येतात आपली परीक्षा घ्यायला
म्हणून नेहमी सज्ज असाव त्याच्या स्वागताला
अन् पचवून त्याला चोख उत्तर द्यावे दैवाला
कविता लिहिलेला दिनांक - १८-६-२००७ [वय वर्षे १७]
Yoo really nice one
ReplyDeleteYoo really nice one
ReplyDeleteThank youuu......
ReplyDelete