थोडस कौतुक
स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतःला चांगल्या वाटतातच
पण कधी दुसऱ्याचंही कौतुक करा त्यांच्या चांगल्या गोष्टींचं
आपण दुसऱ्यांच्या हजार तक्रारी करतो
पण कधी स्वतःत डोकाहून बघतो ?
की नेमकं आपण काय दुसऱ्यासोबत करतो ?
का असतात काही असे की फक्त मला बघा आणि फुल वाहा
तुम्ही कोणी असाल तरी फक्त मला बघा
आणि सदा नि कदा मला झेला
स्वतःच काही असेल तर दुसऱ्यांनी तोंडभरून कौतुक करावं
पण तसेच दुसऱ्याच काही असेल तर यांनी मात्र मठ्ठ बसावं
हे कुठलं वागणं की सतत आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवावं
अंह तक्रार नाही करतय कुणाची
just लक्षात आणून देतेय की चूक कधी नसते कुना एकाची
कारण टाळी कधीच नसते एका हाताची
उगाच म्हणत नाहीत जे पेराल ते उगवेल
जसे द्याल तसे मिळेल
आणि जसे वागलं तसे याच जन्मात परत मिळेल
so का कुणाला कमी लेखायचं
का कुणाचं मुद्दाम कौतुक नाही करायचं
अन का उगाच स्वतः स्वतःला खात राहायचं
त्यापेक्षा खुल्या मानाने राहा ,चांगल्या गोष्टीच मनभरून कौतुक करा
काही फरक नाही पडत कुणाला चांगलं म्हणालात तर , चांगलं बोललात तर
हं एक आहे की समोरचा तेवढाच खुश होईल आणि आणखीन तुम्हाला जवळ होईल
शेवटी माणसाला काय न्यायचे असते पैश्यापेक्षा माणूस कमवणं imp असते
- कविता लिहिलेला दिनांक: 18 ऑगस्ट 2017
No comments:
Post a Comment