Monday, December 26, 2022

ते १०० दिवस जिद्दीचे

पुण्यात असताना मी एका ब्यूटी पार्लरवाल्या ताई कडे जायचे. ते पार्लर माझ्या घराजवळच होत. नेहमी जाण-येणं असल्याने चांगली ओळख होती. जेव्हा केव्हा जायचे तेव्हा छान गप्पा व्हायच्या. ती तिच्या मुलीबद्दल, माहेरकडच्या फॅमिली बद्दल , तिच्या एजुकेशन जर्नी बद्दल, तिच्या बिजनेस स्ट्रगल बद्दल अशा बर्याच गोष्टी शेअर करायची. so अशी चांगली मैत्री असल्या कारणाने आम्ही आमचे नंबर्स पण एक्सचेंज केलेले. जेव्हापासून मी दुबई मध्ये आले तेव्हापासून माझी आणि तिची प्रत्यक्ष होणारी भेट अर्थातच थांबली. व्हाट्सअप थ्रू कॉंटॅक्ट होतो पण तो हि rarely. मग एकमेकांच्या स्टेटस थ्रू एकमेकांच दर्शन होत. कालपरवा मी तीच स्टेटस पाहील - "At Barcelona Airport"अस. मला वाटलं गेली असेल फिरायला वगैरे तिकडे. काही क्षणात तिने दुसरे फोटोज टाकले आणि तेव्हा मला कळाल की ती फॅमिली ट्रीपवर नाही तर conference ला गेली होती. अर्थातच Beauty Conference होती ती कसलीतरी I don't know exact details, but it was arranged by "Matrix" in Barcelona. खर सांगू, तिचे ते फोटोज, ते तिचे क्षण पाहून मला तिचा इतका अभिमान वाटला ना कारण मी तिची अशी ही जर्नी जवळून पहिलीय , ऐकलीय.
ती एका गरीब घरातली मुलगी, 4-5 बहिणी 1 भाऊ. अशी मोठी फॅमिली असल्याने ईच्छा असूनही तिला जास्त शिक्षण नव्हतं घेता आलं. घरी हातभार लावता यावा म्हणून तिने साधा, कमी पैशात होणारा Beauty parlor चा कोर्स गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट थ्रू केला. काही दिवस एका ठिकाणी काम केल, नंतर तो तिच्या अंगातला काहीतरी आपल स्वतःच करण्याचा कीडा तिला बसू देत नसल्याने मोठ्या जिद्दीने आणि जमवलेल्या पैश्यातून तीन छोटस तीच एक पार्लर सुरू केल. ते पार्लर तिने तिच्या हुशारीने, चातुर्याने, कम्यूनिकेशन स्किल्स नि खूप मोठं केल. मी जात होते तेव्हा तीच पार्लर मिड्ल ऑर we can say लोवर मिड्ल स्टेज ला असेल. एका रूमच छान फर्निश्ड वगैरे होत. माझ्यासमोर एका वर्षात तिच्या एकाच्या दोन आणि दोनाच्या चार रूम्स झाल्या. आणि मी इकडे आल्यानंतर तिने पुण्यात आणखीन दोन नवीन ब्रांचेस पण ओपन केल्या. मला आत्ताही आठवत ती नेहमी मला एक गोष्ट सांगायची की कधी पण जेव्हा तीला खचल्यासारख, हरल्यासारख वाटत तेव्हा ती तिच्या बिजनेस गुरूंचे शब्द आठवते की "कुठल्याही बिजनेसला 100 दिवस द्यायचे आणि मग ठरवायच काय करायचे ते.लगेच निराश नाही व्हायच." आणि असा गुरूमंत्र फॉलो करून आज ती एक "Successful Businesswoman" आहे . जी फॉरिन कंट्रीजमध्ये Conference अटेंड करतेय आणि ते पण चाळिशीच्या आत.
तुम्ही म्हणत असाल की मी हे सगळं का सांगतेय? का बोलतेय? तर या ताईच एवढं यश पाहून मला एक कळलं की जर तुमच्यामध्ये talent असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात एव्हरेस्ट गाठू शकता. त्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनियरच असण्याची गरज नाही.आपल्याकडे डॉक्टर आणि इंजिनियर म्हणजेच करीअर आहे अस समजलं जात. विशेतः आमच्या मराठवाड्यात तरी. मग कीतिका कमी पगार भेटना आणि न का दवाखाना चालेना. पण आम्हाला आमचा मोठेपणा अफाट प्रिय आहे. हे दोन करीअरसोडून कुणी जर दुसर काही करत असेल तर आम्ही ते काही कामाच नाही, त्याला काय फ्यूचर आहे? , त्याला काय अर्थ आहे? अस समजतो. खर पाहील तर आज कितीतरी असे दुसरेही क्षेत्र आहेत जिथे आपण खूप काही करू शकतो, फक्त गरज आहे आपलं योग्य ते talent शोधून त्या मार्गाने जाण्याची. पण आम्ही आमच्या जगातून बाहेर निघायलाच तयार नाहीत आमच डोक या इंजिनियर - डॉक्टर, डॉक्टर-इंजिनियर मधून बाहेर निघतच नाहीये.आज आमच्याकडे कितीतरी जन लाखो-करोडो खर्च करून आपल्या मुलामुलींना डॉक्टर,इंजिनियर बनवतायत. फक्त मोठेपणासाठी आई वडील अख्या जीवनाची कमाई पणाला लावतायत. खरचं हे अस सगळ करण्याची गरज आहे का? हे एवढं worth आहे का? या सगळ्याचा विचार करण फार गरजेच आहे. बर इंजिनीयर्सच एखाद्यावेळी निभावून पण जाईल.जास्तीत जास्त काय तर मशीन्स-कंप्यूटर्स फुटतील,खराब होतील😂. पण डॉक्टरच ? आणि मग आपल ??? 😋
मग आता आपल्या मनात असा विचार येतो कि - हे सगळं बरोबर आहे ग बाई पण हे टॅलेंट टॅलेंट जे तू म्हणत आहेस त्याचा शोध १२वीला असतानाच कसा लागायचा? अर्थातच तो नाही लागणार. मला तर वाटत आपल्यापैकी ९०% लोकांचं असंच होत असणार - आवडत एक, करावं वाटत एक, पण करतो एक. खरं तर आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही हटके टॅलेंट असत आणि ते आपल्याला माहितीपण असत, पण आपण त्या मार्गाने जाण्याचं धाडस करत नाहीत. most of the time बॅरिअर असतं ते age च. कि आता या वयात एवढं सगळं व्यवस्थित सुरू असलेल सोडून कुठे तिसरच करायचं? पण खरं तर आपल्याला कधीच कुठलीच गोष्ट सुरु करण्यासाठी late झालेला नसतो. age हे फक्त numbers असतात बाकी सगळं आपल्या मनावर अवलंबून असत, नाही का?. याच एक फेमस उदाहरण म्हणजे KFC चा मालक - तुम्हाला माहिती का KFC च्या logo वर जो म्हातारा आहे तो कोण आहे? का आहे? (बऱ्याच जणांना हे माहितीही असेल). तो आहे Colonel Sanders. ज्यांनी वयाच्या ६२व्या वर्षी गल्लोगल्ली, दारोदारी फिरणं सुरू केलं. कल्पना ही होती की ह्यांनी आपल्या चिकनची माहिती द्यायची आणि समोरच्याने तयारी दाखवली तर त्याच्या समोर चिकन बनवून द्यायचं! तब्बल १००९ वेळा त्याला नकार मिळाला पण स्वतःवरच्या विश्वासाच्या जोरावर तो "one more chance" असं म्हणत पुढे गेला आणि शेवटी एक होकार मिळाला. Pete Harman यांच्याकडून – ज्यांचे स्वतःचे हॉटेल होते. सॅन्डर्सने त्यांच्याशी भागीदारी केली आणि त्यांच्या स्पेशल चिकनला Kentucky Fried Chicken असे नाव दिले. नंतर हा business इतका वाढवला कि केएफसी ही जगातल्या सर्वात मोठ्या फूड चेन्स पैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली.
हे झालं वयाच्या बंधनाच उदाहरण झालं. खर तर अशी हजारो उदाहरण आहेत आपल्याकडे. फॉर example चेतन भगत, अरविंद केजरीवाल ज्यांनी आपलेलं सुरळीत life सोडून मनाचं ऐकून जे हवं ते केलं. असच आपणही करू शकत नाही का? फक्त आपल्याला एक म्हणत राहायचं आहे "मै कर सकती है अशोक,मै कर सकती है "(डायलॉग आहे हा 'तुम्हारी सुलु' movie मधला ). शेवटी प्रश्न उरतो तो पैशांचा पण खर सांगायचं तर बरीच श्रीमंत लोक आपले अनुभव टाहो फोडून सांगत आहेत कि शेवटी माणसाला पैशांनी नाही तर आत्मिक समाधानाने खरा आनंद प्राप्त होतो किंबहुना मोक्ष मिळतो. मग आपण 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' म्हणत मोक्ष मार्गाने का नको जायला?
- शरयू मनोहर पाटील☺️

Monday, March 18, 2019

आयुष्यआयुष्य

आयुष्य आयुष्य म्हणजे नेमक असत तरी काय
दररोजच्या त्याच गोष्टी त्यात नवीन तरी काय

थोडीशी साखर अन् थोडस मीठ
खाली वर झाल तर बिघडून जाते डिश

कोणता दिवस कसा तर कोणता कसा
थांबत नाही तो कधी फक्त चालवत राहतो आपला वसा

कधी कधी सगळ एकदम थांबूनच जात
खराब झालेल्या सीडी सारख अडकतच राहत

सगळ जणू काही एका चित्रपटासारख
जिथे हजारो नट अन् हजारो पात्र

नेहमी एक प्रश्न सतावतो  मला की का हे सगळ चालय
आपण नेमक काय शोधतोय आणि कशासाठी पळतोय

शेवटी एक मात्र खर आलेल्या वेळेला मारून तर न्यावच लागणार
कारण आता आलेया भोगासी तर  सादर तर असावेच लागणार

Friday, March 8, 2019

स्त्री-सन्मान


गोष्ट १:

नचिकेता… एक Software Engineer, Married. दररोज सकाळी उठणे, आवरणे,ऑफीसला जाणे हा दररोजचा उपक्रम. सासू-सासरे, मोठी नणंद सगळे सोबत राहतात. सकाळी सगळ्यांच आवरून ही ऑफीस साठी ८ वाजता निघते. ऐकल तर नवल वाटण्यासारखंच, एवढ्या सगळ्या लोकांच ती एकटीने करते पहाटे उठून आणि ठीक 8 वाजता बाहेर पडते ते पण कुणाचीही मदत नाही, अगदी कामवाल्या बाईची सुद्धा नाही. फॅमिली अगदी गडगंज आहे पण तरी सासूचा अट्टहास असतो कीं सगळ तूच करायच आम्ही नाही का केल? ही तशी या विषयावर गप्प नाही बसत पण शेवटी काही चालत नाही तीच. नचिकेता तशी खूप बडबडी, एकदम मन मोकळी, बिनधास्त आहे. सगळ एकदम नेटाने करते. तीच सगळ एकदम हॅपी हॅपी सुरू असत, कोणत्या गोष्टींचा ती कधी ताण नाही घेत. But still तिला वाटत की somewhere something is missing. कारण मुद्दा कधी तरी कुणी समजून घेण्याचा असतो.

त्या दिवशी वीकेंड होता काही इंपॉर्टेंट काम असल्याने नचिकेताला ऑफीसला जाव लागलेल. तब्बल १४ तसानंतर ती घरी आलेली, रात्रीचे ९ वाजलेले असावेत. घरी मात्र एकदम जल्लोष सुरू होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि हे दिवस म्हणजे मुली माहेरी राहायला येण्याचे आणि या दिवसात तिची मोठी नणंद पण बरेच दिवसापासून आलेली. मग सोबत तिचे बच्चे, कुणी ८ मध्ये तर कुणी १२ वि मध्ये आणि तिचा नवरा असे सगळे आलेले. so घरी सगळ्यांची मस्ती सुरू होती. त्या दिवशी ती प्रचंड थकलेली, पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे तिची या अवस्थेत अगदी कुणाला बोलायची इच्छा सुद्धा नव्हती एवढी कंटाळून गेलेली. तिने सगळ्यांना स्माइल केली आणि फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेली तेवढ्यात सासूने आवाज दिला " नचिकेता, अग दिवसभर तर नव्हती घरात निदान आत्ता तरी ये बोलायला".

नचिकेता: "हो हो आले, फ्रेश होतेय"

मग नचिकेता फ्रेश होऊन हॉल मध्ये गेली.

सासू: "अग आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो, ते तू पनीर ची भाजी फार छान करतेस ना सगळ्यांना आवडते तुझ्या हाताची, कर ना आज ती"

नचिकेता: "अरे तुमची जेवण झाली नाहीत आणखीन? मला वाटल जेवण वगेरे करून तुम्ही गप्पा मारत बसला आहात"

नणंद: "अहो नाही वाहिनी तुमचीच वाट पाहत होतो, आज दिवसभर शॉपिंग ला गेलेलो ना मग तिथे चटर पटर खाल्लो. पण आता जाम भूक लागली आहे, बनवा ना पटकन जेवायला"

नचिकेता: "ओके, लागते मी तयारीला"

नचिकेताला वाटलेल की आता घरी जाऊन निवांत खाऊन झोपी जावे पण सगळे उलटे झाले नेहमीप्रमाणे, म्हणजे एरवी घरी ऑफीस मधून लवकर येणं होत तेव्हा कामाच काही नाही वाटत पण अशावेळी... मग ती स्वयंपाक घरात गेली आणि पाहते तर काय फक्त भाजी नाही तर सगळा स्वयंपाक राहिलेला. तिने एकटीने सगळ बनवल आणि रात्री ११ वाजता जेवणं झाली.

As earlier said that she still feels something is missing कारण प्रश्न कधी काम करण्याचा नसतो तर समजून घेण्याचा असतो.

गोष्ट २:

नुकतीच दिवाळी झालेली, नंदिनी आणि राज आपापल्या घरी आलेले मुंबईला. परत सगळा दिनक्रम सुरू झालेला हॉस्पिटल ला जाण येणं . एक ८ दिवसानी घरी फोन झालेला तेव्हा कळालं की राजचे आई-बाबा मुंबईला येत आहेत काही कामासाठी. खर तर त्याच्या बाबांनी  बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक जागा विकत घेतलेली, तेव्हा आता त्या जागेवर घर बंधायला सुरू करायच होत. मग एक दोन दिवसांनी ते आले. त्या सगळ्यांच म्हणजेच राज, त्याचे आई- बाबा आणि त्याची बहीण आणि तिचा नवरा अशा सगळ्यांचं architect कडे जाण सुरू होत, planning and all. राजची बहीण तिथेच राहते म्हणून ते दोघेपण (दोघे म्हणजे she and her husband) सगळ्या गोष्टींमधे नेहमी असतात.

ते दोघे तिथे राहतात म्हणून ते नेहमी प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी असतात पण नंदिनी तिथे घरात असून पण ती कधीच कुठल्या गोष्टीचा part नसते आणि ही गोष्ट राजच्या आई-वडिलांची आहे आणि त्यांच्या मध्ये त्यांना जर नंदिनी नको वाटत असेल तर कशाला म्हणून राज उगाच तिला कशात अडकवत नाही कारण अस उगाच तिला मध्ये आणल्यावरही तिला नेग्लेक्टच केल जात. त्यादिवशी यांनी आर्किटेक्टकडून प्लान बनवून आणलेला. घरी बसून सगळ्यांची चर्चा सुरू होती. नंदिनी किचन मध्ये आपल आवरत होती. नंतर ती हॉल मध्ये आली पण कुणीही तिला घराचा प्लान पाहण्यास विचारले नाही. ती आपापली newspaper वाचत बसलेली. प्लान पाहायलाच नाही बोलावल तर सजेशन मागन तर लांबच. बर असहि नाही की नंदिनी काही शिकलेली नाही चांगली डॉक्टर आहे आणि शिकलेली नसली तरी तिला महत्व देण्याची गरज नाही? त्यानंतर घर बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त ठरला आणि यांच्याकडे कोणताही काम सुरू करण्याआधी पूजा केली जाते त्यामुळे पूजा करायची ठरलेली आणि प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांनी हेसुद्धा नंदिनीला नाही संगितल. त्याच्या आईच म्हणन की काय करायचय तिला, तीच तिला हॉस्पिटल मध्ये खूप काम असतात. पण हे तीन ठरवायला हव होत ना? नाही की ह्यांनी?

गोष्ट ३:

काल मी इंग्लीश विंग्लिश पिक्चर पाहत होते तेव्हा माझ मन माझ्या भूतकाळात भरकटत गेल आणि मला एका काकूंची आठवण झाली. नेहमी मला एका गोष्ठीवरुन बर्‍याच गोष्टी आठवतात आणि मी भरकटते. सवयीप्रमाणे मी तब्बल ७-८ वर्षे मागे गेले. जे माझ्या आयुष्यातले सगळ्यात सोनेरी दिवस. कॉलेजसाठी नाही पण माझ्या रूमसाठी ते दिवस मला सोनेरी वाटतात, मी फार छान आणि निवांत राहीले त्या काळात. मला नाही वाटत तेवढी सुखी मी कधी राहीले असेन. हां तर मुद्दा हा की मला त्या काकूंची आठवण झाली. तिथे माझ्या घर मालकांच्या त्या शेजारी राहायच्या आणि त्यांची मुलगी माझी चांगली मैत्रीण होती त्यामुळे माझ नेहमी तिथे जाण असायच. गप्पा टप्पा नेहमी व्हायचा.

त्यांना दोन मुली, काकू स्वभावाने फार गोड, सतत हसणार्‍या, सतत फ्रेश, नेहमी मुलींच्या मागे पुढे, हे हव का ते नको का म्हणजे फरच प्रिय वाटाव्यात अशा. माझ आणि त्यांच फार जमायच. मी त्यांच्या मुलीला कमी आणि त्यांनाच जास्त बोलायचे. माझी आणि त्यांची फार छान मैत्री झालेली. पण मला नेहमी एक गोष्ट खटकायची ती ही की त्या मुलांबाबतीत फारच शांत, नम्र वागनार्‍या. म्हणजे त्यांच्या मुली त्यांना येता जाता कशाही बोलायच्या कुणासमोरपण आणि त्या काहीच म्हणायच्या नाहीत फक्त हसायच्या. ते मला अजिबात आवडायच नाही कारण मुलं लहान असतील तर ठीक आहे पण लग्नाच्या वयाच्या पोरींनी अस सतत टाकून बोलन. मी अस कधीच पाहील नव्हत एवढ हिडिस फिडीस आणि ते पण शुल्लक गोष्टींवरून? मलाच कधी कधी त्यांना मार द्यावसा वाटायचा. त्या पोरी बोलल्या की त्या एवढस तोंड करून बसायच्या. मला फार दया यायची त्यांची. आणि कधी कधी रागपण की का त्या कधी काहीच नाही बोलत?का सतत गप्प बसतात आणि सहन करतात? बर इथे असही नव्हत की बोलणारी माणसं मोठी आहेत त्या आपल्या पोटच्याच मुली आहेत मग काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे मला अस वाटायच की कधी कधी काही गोष्टी हिसकावून घ्यावाच लागतात त्या आपोपाप मिळत नाहीत.

या अशा खूप सार्‍या गोष्टीआहेत सासू-सुनेच्या, आई-मुलीच्या, बहीण-बहिणीच्या वगेरे. पाहायला गेल तर नचिकेता काही जास्त expect नाही करतेय एवढच म्हणतेय की मला समजुण घ्या आणि एक सांगू का जेव्हा एक सून जॉइंट फॅमिली मध्ये राहते तेव्हा नवर्‍यापेक्षा जास्त तिला सासुच्या सपोर्ट ची गरज असते. आणि जर सासू कडून सपोर्ट मिळाला तर बाकींच्यांकडून आपोआप सपोर्ट मिळतो कारण नाही म्हणल तरी घराची डोर ही एका स्त्रीच्या हातातच असते. आणि नंदिनी एक परकी पोर तुमच्या घरात येते, तुमच्यातली एक तिला करायच असेल तर तिला तुमच्यात सामावून घेतल पाहिजेच आणि ती आई... ती फक्त दोन गोड शब्द मागतेय बाकी काहीच नाही.

मी तर फक्त बोलण्या-वागण्याची उदाहरणं दिलियेत, आपण जर समाजात आणखीन खोलवर जाऊन पाहील तर जाळण्या-मारण्यापर्यंतच्या, स्त्री-भ्रुन हत्येच्या गोष्टी आहेत. कित्येक वेळा यात सासूचा, नणंदेचा, आईचा, सुनेचा पुढाकार असतो. या सगळ्या गोष्टी पहिल्या की अस वाटत की स्त्रीला रेस्पेक्ट ची गरज जास्त कुणाकडून आहे? आपण म्हणतो ना की पृथ्वीतलावर फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरूष. तर आधी एकाच जातितल्या लोकांनी एकमेकांकडे रेस्पेक्टनि पाहण्याची गरज आहे. म्हणजे स्त्री ने स्त्रीला आधी रेस्पेक्ट दिला पाहिजे राइट? आणि आपण असही म्हणतो ना की ज्या पद्धतीने आपण स्वतःकडे पाहतो त्या पद्धतीनेच जग पाहत. तर ते इथेपण लागू होऊ शकत. तर तत्पर्य हे की स्त्रीला आदर हा फक्त पुरुषांनी नाही तर एका स्त्री ने दुसऱ्या स्त्रीलाला पण देण तितकच गरजेच आहे आणि जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मान देणार नाही तोपर्यंत तिला पूर्ण इंपॉर्टेन्स प्राप्त होणार नाही.

Happy Women's Day!

Monday, August 21, 2017

नातं


नातं

कोणतंही  नातं  मानन्यावर  असत
जमलं  तर  जमत  नाहीतर  फसत  
आणि  मधलं  तर  कधीच  कामाचं  नसत

just निभवायचं   म्हणून  निभावण्यात  काहीच  अर्थ  नसतो
पण  तरी  आपण  कितीतरी  वेळा  हेच  करतो
वेळ  साधून  नेणं  कदाचित  आपण  यालाच  म्हणतो

प्रत्येक  फसलेल्या  नात्याला  काहीतरी  background असत
काहीतरी  बोलेल  किंवा  वागलेलं  मनात  कोपऱ्यात  कुठेतरी  असत
कारण  ते  बोलणं  बाण  बनून  मनाला  छेडलेलं  असत

का  असतो  माणूस  असा , का  नाही भरत  तो  छेद  मनाचा
का  बनतो  तो  शब्द  अतिमहत्वाच्या
का  नेहमी  शेमबुड  दिसतो  दुसऱ्याच्याच  नाकाचा

चूक  कधीच  एकाची  नसते
बेरीज  कधीच   दुसऱ्या  अंकाशिवाय  होत  नसते
आणि  टाळी  कधीच  एका  हाताने  वाजत  नसते

शेवटी  काय  नातं  नको  म्हणलं  तरी  निभाव  लागत
म्हणून  आपलं  मानून  राहिलेलं  बरं  असत 
कारण  झालं  गेलं  विसरून  राहण  सगळ्यासाठी  चांगलं  असत

               - कविता लिहिलेला दिनांक: 10 जून 2017

थोडस कौतुकथोडस कौतुक

स्वतःच्या  सगळ्या  गोष्टी   स्वतःला  चांगल्या  वाटतातच  
पण  कधी  दुसऱ्याचंही  कौतुक  करा  त्यांच्या  चांगल्या  गोष्टींचं

आपण  दुसऱ्यांच्या  हजार  तक्रारी  करतो
पण  कधी  स्वतःत  डोकाहून  बघतो ? 
की  नेमकं  आपण  काय  दुसऱ्यासोबत  करतो ?

का  असतात  काही  असे  की  फक्त  मला  बघा  आणि  फुल  वाहा
तुम्ही  कोणी  असाल  तरी  फक्त  मला  बघा
आणि  सदा  नि  कदा  मला  झेला

स्वतःच   काही  असेल  तर  दुसऱ्यांनी  तोंडभरून  कौतुक  करावं
पण  तसेच  दुसऱ्याच  काही  असेल  तर   यांनी  मात्र  मठ्ठ  बसावं
हे  कुठलं  वागणं  की  सतत  आपण  दुसऱ्यांकडून  अपेक्षा  ठेवावं

अंह  तक्रार  नाही  करतय  कुणाची 
just   लक्षात  आणून  देतेय  की  चूक  कधी  नसते  कुना  एकाची
कारण  टाळी  कधीच  नसते  एका  हाताची

उगाच  म्हणत  नाहीत  जे  पेराल  ते  उगवेल
जसे  द्याल  तसे  मिळेल
आणि  जसे  वागलं  तसे  याच  जन्मात  परत  मिळेल

so का  कुणाला  कमी  लेखायचं
का  कुणाचं  मुद्दाम  कौतुक  नाही  करायचं
अन  का  उगाच  स्वतः  स्वतःला  खात  राहायचं 

त्यापेक्षा  खुल्या  मानाने  राहा ,चांगल्या  गोष्टीच  मनभरून  कौतुक  करा
काही  फरक  नाही  पडत  कुणाला  चांगलं  म्हणालात  तर , चांगलं  बोललात  तर
हं   एक  आहे  की  समोरचा  तेवढाच  खुश  होईल  आणि  आणखीन  तुम्हाला  जवळ  होईल
शेवटी  माणसाला  काय  न्यायचे  असते  पैश्यापेक्षा  माणूस  कमवणं  imp असते

                                - कविता लिहिलेला दिनांक: 18 ऑगस्ट 2017

Monday, November 28, 2016

दोस्ती


दोस्ती
वैसे तो दोस्ती के बारेमे बहोत लोगो ने बोलके रखा है
पर आज मौका है तो मुझेभी ये छोड़ना नही है

वैसे तो हमारा हर रिश्ता बहोत खास होता है
मगर दोस्तो की तो बात ही कुछ अलग होती है
और उसमेभी इस कम्बक्त IT वर्ल्ड मे अछा दोस्त मिलना मुश्किल होता है 

But you know कभी कभी miracle हो जाते है
और चुपके से याराना बन जाता है
जो हमेशा हर घड़ी तुम्हे सपोर्ट करता है

पर जिंदगी का एक दस्तूर है 
हर वक्त एक जैसा होता नई है
और आज भी कुछ ऐसेही होने जा रहा है

पर हमेशा याद आएँगी लंच टेबल पे शेर की हुई कहानियाँ
साथ मे celebrate की हुई पार्टियाँ
और छोटू छोटू लधाइयाँ

पता है पता है अभी सब बोलेंगे
की कोई नही यार हम मिलते रहेंगे
पर बाद मे हमेशा सभी कुछ ना कुछ बहाने मारेन्गे

But कोई problem नई तुम दूर रहो या पास
तुम हमेशाही रहोगे हमारे खास
क्योकि what's up  और skype तो है ही हमारे पास

अब लास्ट मे इतना ही क़हना है
की जिंदगी मे हमेशा तुमको खुश रहना है
और हर बुलंदियों को चुना है..
                                                                                                                         शरयू पाटील
                                                                                                                         24-11-2016
                                                                                              Created on occasion of farewell of friend

Saturday, June 18, 2016

बाबा

बाबा

खरच बाबा म्हणजे घराचा पाया
ज्यांच्या मनात साठलेली असते आई एवढीच माया

प्रतेकजण सारखा कसा राहील
जो तो आपापले प्रेम व्यक्तच कसे करील
सगळे सारखे असता वेगळेपण कसे राहील
म्हणून तर देवाने सर्वांना वेगवेगळ्या साच्यात बनविल

बाबा प्रत्येक गोष्ट सांगत नसतात
ते सतत आपल्या कामात असतात
त्यांच म्हणन की   सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात 
म्हणून तर काही वाईट वाटल की  ते फक्त शांत बसून राहतात

सतत असते त्यांना घराची काळजी
गुंतलेले असतात जमा करण्यात जन्माची पुंजी
कधी लक्षही देत नाहीत की त्यांची कपडे होतायत खूजी
नेहमी हसत मुखाणे प्रत्येकाच्या कामाल होतात राजी

कठोर, कर्तृत्वं, दयाळू असतात ते बाबाच
अन् संकटात आपल्याला आठवतात ते बाबाच
प्रत्येक अडचण स्वत:ची समजुण धावतात ते बाबच
म्हणून तर आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार हे बाबाच

               - कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2009 [वय वर्षे-19]