Thursday, January 28, 2016

मैत्री

मैत्री

मैत्री म्हणजे दोन जिवामधल नात
जे प्रत्येकाला ह्वह्वस वाटत

कळतच नाही कधी होऊन जातो आपण समोरच्याच
मनातल सांगायला भेटत कुणीतरी हक्काच
कधीच न तुटणार अनमोल बंधन जन्माच
नात नसत ते रक्ताच तर ते असत मनाच

जात नसते पात नसते असते ते फक्त निर्मळ मन
अन् हवाहवासा वाटणारा असतो तो प्रत्येक क्षण
खूप कमी जणांच्या नशिबी असत हे देण 
पण ज्यांना हे लाभतं तो असतो भाग्यवान 

सुखदुखच्यावेळी कामी येणारं
खर्याखोट्याची जाणीव करून देणारं
प्रत्येक क्षण वाटून घेणारं
अन् आपल्याबद्दल चांगला विचार करणारं

मैत्रीत एका वेगळ्याच प्रेमाचा धागा गुंतला जातो 
धागा म्हटल की तो कधी ना कधी तुटतो
पण हा त्यातला नसतो
कारण हा मनातल्या घट्ट तारांनी  बणलेला असतो


                                                                             कविता लिहिलेला दिनांक - २०-६-२००७ [वय वर्षे-१७]

4 comments: