Friday, August 16, 2013

शोध

शोध
तोच पाऊल परत परत पडतोय
तीच दिशा परत परत धावतेय

दररोज दररोजच तेच जगण अन् मरण
आजकाल हसू सुधा झालाय उसन

वारा पण तीच जागा धरतोय
अन् मन पण तिथच थांबतय

कळत नाही कशासाठी चाललय हे सगळ
कोणत आकाश ठेंगन करण्यासाठी चाललीय ही तळमळ

नको ते पाऊल  को ती दिशा
नको ते जगन अन् नको ते हसू

समुद्राच्या लाटेसारख दूर कुठेतरी जावस वाटतय
एकांत शांत बसून स्वत:ला शोधव वाटतय

फक्त हवाय एक सुखाचा क्षण
ज्याने न्हाउन निघेल माझे मन

शरयू पाटील

१५ ऑगस्ट २०१३

10 comments: