Saturday, February 27, 2016

शिक्षण

शिक्षण

शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध
त्याशिवाय लागत नाहीत जीवनातला शोध

हे मिळवन म्हणजे मधामाशासारखी गत
यात कसे प्रत्येक माशी भरवते आपले हात
त्याचप्रमाणे हे पूर्ण करण्यासाठी करावी लागते प्रत्येक परीक्षेवर मत
मगच तर जीवन फिरत यशाच गान गात

याशिवाय जगात मिळत नाही कोठे मान
हे नसेल तर पदोपदी होतो अपमान
जर मिळवायचा असेल सर्वांकडून मान
तर गुरुजनांकडून घ्यावे लागते विद्याचे दान

जीवनात वा जगात अवघड काही नसते
फक्त ती मिळवण्याची इच्छाशक्ती असावी लागते
जेव्हा हे आपल्या मनात ठाम भिनते
तेव्हा शिक्षणच आपली साथ देऊ लागते

खरच शिक्षणाशिवाय नाही दुसर दागीन
यामुळेच तर आपल्याला मिळत नवीन जीवन
यामुळेच तर आपल्याला भेटत यशलाविण्य
आणि मग उलगडत आपल्या यशाच दालन

- शरयु पाटील
                            - कविता लिहिली तेव्हाचे वय - १७

No comments:

Post a Comment