आशेचा किरण
जीवनात हवा एक आशेचा किरण
त्यास पाहून रचावे आयुष्याचे धोरण
हाच किरण नेतो आपणास पुढे
आणि तोच शिकवितो जीवनाचे पाढे
त्यामुळेच तर जाते आयुष्याची गाडी मागे पुढे
हाच दाखवितो जगण्याची दिशा
त्यामुळे वाढते काही करण्याची आशा
आणि सुरू होते आयुष्यात यशाची परिभाषा
यामुळे जाणवतो जगातला दोष
तोच दाखवितो त्यांच्यातला रोष
आणि आपणास भेटतो जगाशी तोंड देण्याचा विचारकोष
या किरणामुळे एकिकडून भेटतो तो विरंगुळा
आणि एकिकडून भेटेतो तो आयुष्यभींतीत रोवयचा मोळा
त्यामुळेच तर तयार होतो जीवनात एक सोनेरी गोळा
म्हणून तर जीवनात हवा एक आशेचा किरण
जो करी आयुष्य समृद्ध आणि संपन्न
- शरयु पाटील
- कविता लिहिली तेव्हाचे वय - १७
No comments:
Post a Comment