Saturday, February 27, 2016

माणुसकी

माणुसकी

आज माणुसकी राहलीय का कुणाला
सगळे विचारतात ते फक्त कामाला

हे अस वागण का कशासाठी? कळत नाही मला
अहो मागेपुढे पाहतात साधे बोलण्याला हसण्याला
कधी वाटत दिवसाबरोबर बदल असावाच लागतो का माणुसकीला
अस करून काय मिळत ते माहीत त्याच माणसाला

मैत्री मैत्री राहिली नाही
नात नात राहील नाही
असे सम्बधच आता का हे कळत नाही
आणि यामुळेच माणूस माणूस राहिला नाही

त्याला त्रास होतो ना माग होऊ देत
इथे कुणाच्या कुणाच काय जात
जवळ या जर चालत असेल माझ भात
नाहीतर व्हायच आपापल्या वाटेनी चालत

हा येतो तो येतो नाव ठेवतो एकमेकांना 
पण तुझ्यात बघ तोच .तर तू नाहीस ना
लक्षात ठेव माणसा आपण एकटचे असतो येताना अन् जाताना
त्यामुळेच तर माणुसाकीने वागावे जीवन जगताना   


 - शरयु पाटील
                              - कविता लिहिली तेव्हाचे वय - १९

No comments:

Post a Comment