पाऊस
तुला माहितीये लहानपणी फिरायला जाताना तू वाटायचास नकोसा
पण पुन्हा कळाल तूच तर देतोस जगाला दिलासा
तुझ्याविना फूल नाही पान नाही काहीच नाही
तू पहिल्यांदा येतोस तेव्हा अंगाची करतोस लाही लाही
पण पुन्हा देतोस शेतकर्यांच्या यशाची ग्वाही
त्यामुळेच तर त्यांच्या घरी सुख-सम्रुधि वाही
कधी कधी अपेक्षेपेक्षा अधिक पडतोस अफाट
मग शेतातली सगळी पिके करतोस सपाट
कधी कधी जून जूलै पर्यंत पाहायला लावतोस वाट
आणि जमीन अगदी होते कोरडी फकाट
तुझमुळे सगळी रस्ते भरतात तुडुंब
पण आमच्या पोटात मात्र फुटतो आटम बॉम्ब
कारण त्यामुळे शाळेत जायची होते बॉम्बाबोंब
म्हणून तर म्हणते ना तू ये आता ताबडतोब
तू कधी काय घेऊन येशील सांगता येत नाही
कधी सुख तर कधी दु:ख पण रिकामी हाती येणार नाही
हेच तुझे वेशिष्ट्य हो की नाही
आता सगळे तुझी वाट पाहतात मग सांग तू येणार का नाही
- कविता लिहिलेला दिनांक: 07 जूलै 2007 [वय वर्षे-१७]
mstttt khupch chan Sharayu...
ReplyDeleteHey Thanks Dear......
ReplyDelete