वेळ
प्रथम तुला समजता न कळले तुझे महत्व
फक्त ऐकले होते मी सर्वांकडून तुझ्या जीवनाचे तत्व
सगळे वागतात अगदी तुझ्या नियमाने
जो तो प्रयत्न करतो आपापल्या परीने
जो चुकतो तो विसरतो आपली भाणे
आन् जो पाळतो तो राहतो सन्मानाने
किती आहेस ग तू नियम.बद्ध
कधीच नसतेस तू बेशुद्ध
तू म्हणजे सगळ्यांचा कटीबंद्ध
खरच तुझ्यामुळे बणलो आम्ही शिस्तबद्ध
तुझ्यामुळे वाढते जीवन जगण्याची तळमळ
असते सतत काहीतरी करून दाखवण्याची मरमर
सादांकडा सर्वांच्या पुढे जाण्याची मरमर
अन् उंच झेंडा झळकवण्याची तळमळ
तू आहेस म्हणून आम्ही आहोत एका बंधनात
नाही तर सगळेच नाचले असते आपापल्या तालात
कुणी कुणाला मानल नसत
अन् जग झाल असत अगदी अस्ताव्यस्त
- शरयु पाटील
- कविता लिहिली तेव्हाचे वय - १९