स्वप्न माझ
अजूनही अस वाटत की स्वप्नात आहे मी
जेव्हा स्वत:ला पाहते आरश्यात मी
वाटल नव्हत कधी की तू होशील माझा
अन् बहरेल संसार तुझा मझा
आज वर्ष पूर्ण झालाय आपल्या लग्नाला
पण भासते असे की तू कालच तर भेटला मला
तू नेहमी आपल्याबाबतीत होतास सकारात्मक
पण माझी आपली सतत कॅसेट नकारात्मक
शेवटी मी हारले आणि आपण जिंकलो
सगळ मागे सोडून आपण पुढे निघालो
स्वप्न पूर्ण झाल माझ तूझ्या हातून लाईसन्स घालायच
आणि तुझी बायको म्हणून घेऊन जगभर मिरवण्याच
देव असेल तर आज एकच मागन माझ
की प्रत्येक जन्मी हेच खूळ होऊ दे माझ
[on occasion of first marriage anniversary]