ते १०० दिवस जिद्दीचे
पुण्यात असताना मी एका ब्यूटी पार्लरवाल्या ताई कडे जायचे. ते पार्लर माझ्या घराजवळच होत. नेहमी जाण-येणं असल्याने चांगली ओळख होती. जेव्हा केव्हा जायचे तेव्हा छान गप्पा व्हायच्या. ती तिच्या मुलीबद्दल, माहेरकडच्या फॅमिली बद्दल , तिच्या एजुकेशन जर्नी बद्दल, तिच्या बिजनेस स्ट्रगल बद्दल अशा बर्याच गोष्टी शेअर करायची. so अशी चांगली मैत्री असल्या कारणाने आम्ही आमचे नंबर्स पण एक्सचेंज केलेले. जेव्हापासून मी दुबई मध्ये आले तेव्हापासून माझी आणि तिची प्रत्यक्ष होणारी भेट अर्थातच थांबली. व्हाट्सअप थ्रू कॉंटॅक्ट होतो पण तो हि rarely. मग एकमेकांच्या स्टेटस थ्रू एकमेकांच दर्शन होत. कालपरवा मी तीच स्टेटस पाहील - "At Barcelona Airport"अस. मला वाटलं गेली असेल फिरायला वगैरे तिकडे. काही क्षणात तिने दुसरे फोटोज टाकले आणि तेव्हा मला कळाल की ती फॅमिली ट्रीपवर नाही तर conference ला गेली होती. अर्थातच Beauty Conference होती ती कसलीतरी I don't know exact details, but it was arranged by "Matrix" in Barcelona. खर सांगू, तिचे ते फोटोज, ते तिचे क्षण पाहून मला तिचा इतका अभिमान वाटला ना कारण मी तिची अशी ही जर्नी जवळून पहिलीय , ऐकलीय.
ती एका गरीब घरातली मुलगी, 4-5 बहिणी 1 भाऊ. अशी मोठी फॅमिली असल्याने ईच्छा असूनही तिला जास्त शिक्षण नव्हतं घेता आलं. घरी हातभार लावता यावा म्हणून तिने साधा, कमी पैशात होणारा Beauty parlor चा कोर्स गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट थ्रू केला. काही दिवस एका ठिकाणी काम केल, नंतर तो तिच्या अंगातला काहीतरी आपल स्वतःच करण्याचा कीडा तिला बसू देत नसल्याने मोठ्या जिद्दीने आणि जमवलेल्या पैश्यातून तीन छोटस तीच एक पार्लर सुरू केल. ते पार्लर तिने तिच्या हुशारीने, चातुर्याने, कम्यूनिकेशन स्किल्स नि खूप मोठं केल. मी जात होते तेव्हा तीच पार्लर मिड्ल ऑर we can say लोवर मिड्ल स्टेज ला असेल. एका रूमच छान फर्निश्ड वगैरे होत. माझ्यासमोर एका वर्षात तिच्या एकाच्या दोन आणि दोनाच्या चार रूम्स झाल्या. आणि मी इकडे आल्यानंतर तिने पुण्यात आणखीन दोन नवीन ब्रांचेस पण ओपन केल्या. मला आत्ताही आठवत ती नेहमी मला एक गोष्ट सांगायची की कधी पण जेव्हा तीला खचल्यासारख, हरल्यासारख वाटत तेव्हा ती तिच्या बिजनेस गुरूंचे शब्द आठवते की "कुठल्याही बिजनेसला 100 दिवस द्यायचे आणि मग ठरवायच काय करायचे ते.लगेच निराश नाही व्हायच." आणि असा गुरूमंत्र फॉलो करून आज ती एक "Successful Businesswoman" आहे . जी फॉरिन कंट्रीजमध्ये Conference अटेंड करतेय आणि ते पण चाळिशीच्या आत.
तुम्ही म्हणत असाल की मी हे सगळं का सांगतेय? का बोलतेय? तर या ताईच एवढं यश पाहून मला एक कळलं की जर तुमच्यामध्ये talent असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात एव्हरेस्ट गाठू शकता. त्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनियरच असण्याची गरज नाही.आपल्याकडे डॉक्टर आणि इंजिनियर म्हणजेच करीअर आहे अस समजलं जात. विशेतः आमच्या मराठवाड्यात तरी. मग कीतिका कमी पगार भेटना आणि न का दवाखाना चालेना. पण आम्हाला आमचा मोठेपणा अफाट प्रिय आहे. हे दोन करीअरसोडून कुणी जर दुसर काही करत असेल तर आम्ही ते काही कामाच नाही, त्याला काय फ्यूचर आहे? , त्याला काय अर्थ आहे? अस समजतो. खर पाहील तर आज कितीतरी असे दुसरेही क्षेत्र आहेत जिथे आपण खूप काही करू शकतो, फक्त गरज आहे आपलं योग्य ते talent शोधून त्या मार्गाने जाण्याची. पण आम्ही आमच्या जगातून बाहेर निघायलाच तयार नाहीत आमच डोक या इंजिनियर - डॉक्टर, डॉक्टर-इंजिनियर मधून बाहेर निघतच नाहीये.आज आमच्याकडे कितीतरी जन लाखो-करोडो खर्च करून आपल्या मुलामुलींना डॉक्टर,इंजिनियर बनवतायत. फक्त मोठेपणासाठी आई वडील अख्या जीवनाची कमाई पणाला लावतायत. खरचं हे अस सगळ करण्याची गरज आहे का? हे एवढं worth आहे का? या सगळ्याचा विचार करण फार गरजेच आहे. बर इंजिनीयर्सच एखाद्यावेळी निभावून पण जाईल.जास्तीत जास्त काय तर मशीन्स-कंप्यूटर्स फुटतील,खराब होतील. पण डॉक्टरच ? आणि मग आपल ???
मग आता आपल्या मनात असा विचार येतो कि - हे सगळं बरोबर आहे ग बाई पण हे टॅलेंट टॅलेंट जे तू म्हणत आहेस त्याचा शोध १२वीला असतानाच कसा लागायचा? अर्थातच तो नाही लागणार. मला तर वाटत आपल्यापैकी ९०% लोकांचं असंच होत असणार - आवडत एक, करावं वाटत एक, पण करतो एक. खरं तर आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही हटके टॅलेंट असत आणि ते आपल्याला माहितीपण असत, पण आपण त्या मार्गाने जाण्याचं धाडस करत नाहीत. most of the time बॅरिअर असतं ते age च. कि आता या वयात एवढं सगळं व्यवस्थित सुरू असलेल सोडून कुठे तिसरच करायचं? पण खरं तर आपल्याला कधीच कुठलीच गोष्ट सुरु करण्यासाठी late झालेला नसतो. age हे फक्त numbers असतात बाकी सगळं आपल्या मनावर अवलंबून असत, नाही का?. याच एक फेमस उदाहरण म्हणजे KFC चा मालक - तुम्हाला माहिती का KFC च्या logo वर जो म्हातारा आहे तो कोण आहे? का आहे? (बऱ्याच जणांना हे माहितीही असेल). तो आहे Colonel Sanders. ज्यांनी वयाच्या ६२व्या वर्षी गल्लोगल्ली, दारोदारी फिरणं सुरू केलं. कल्पना ही होती की ह्यांनी आपल्या चिकनची माहिती द्यायची आणि समोरच्याने तयारी दाखवली तर त्याच्या समोर चिकन बनवून द्यायचं! तब्बल १००९ वेळा त्याला नकार मिळाला पण स्वतःवरच्या विश्वासाच्या जोरावर तो "one more chance" असं म्हणत पुढे गेला आणि शेवटी एक होकार मिळाला. Pete Harman यांच्याकडून – ज्यांचे स्वतःचे हॉटेल होते. सॅन्डर्सने त्यांच्याशी भागीदारी केली आणि त्यांच्या स्पेशल चिकनला Kentucky Fried Chicken असे नाव दिले. नंतर हा business इतका वाढवला कि केएफसी ही जगातल्या सर्वात मोठ्या फूड चेन्स पैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली.
हे झालं वयाच्या बंधनाच उदाहरण झालं. खर तर अशी हजारो उदाहरण आहेत आपल्याकडे. फॉर example चेतन भगत, अरविंद केजरीवाल ज्यांनी आपलेलं सुरळीत life सोडून मनाचं ऐकून जे हवं ते केलं. असच आपणही करू शकत नाही का? फक्त आपल्याला एक म्हणत राहायचं आहे "मै कर सकती है अशोक,मै कर सकती है "(डायलॉग आहे हा 'तुम्हारी सुलु' movie मधला ). शेवटी प्रश्न उरतो तो पैशांचा पण खर सांगायचं तर बरीच श्रीमंत लोक आपले अनुभव टाहो फोडून सांगत आहेत कि शेवटी माणसाला पैशांनी नाही तर आत्मिक समाधानाने खरा आनंद प्राप्त होतो किंबहुना मोक्ष मिळतो. मग आपण 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' म्हणत मोक्ष मार्गाने का नको जायला?
- शरयू मनोहर पाटील