गोष्ट १:
नचिकेता… एक
Software Engineer, Married. दररोज सकाळी उठणे, आवरणे,ऑफीसला जाणे हा दररोजचा उपक्रम.
सासू-सासरे, मोठी नणंद सगळे सोबत राहतात. सकाळी सगळ्यांच आवरून ही ऑफीस साठी ८ वाजता
निघते. ऐकल तर नवल वाटण्यासारखंच, एवढ्या सगळ्या लोकांच ती एकटीने करते पहाटे उठून
आणि ठीक 8 वाजता बाहेर पडते ते पण कुणाचीही मदत नाही, अगदी कामवाल्या बाईची सुद्धा
नाही. फॅमिली अगदी गडगंज आहे पण तरी सासूचा अट्टहास असतो कीं सगळ तूच करायच आम्ही नाही
का केल? ही तशी या विषयावर गप्प नाही बसत पण शेवटी काही चालत नाही तीच. नचिकेता तशी
खूप बडबडी, एकदम मन मोकळी, बिनधास्त आहे. सगळ एकदम नेटाने करते. तीच सगळ एकदम हॅपी
हॅपी सुरू असत, कोणत्या गोष्टींचा ती कधी ताण नाही घेत. But still तिला वाटत की somewhere
something is missing. कारण मुद्दा कधी तरी कुणी समजून घेण्याचा असतो.
त्या दिवशी
वीकेंड होता काही इंपॉर्टेंट काम असल्याने नचिकेताला ऑफीसला जाव लागलेल. तब्बल १४ तसानंतर
ती घरी आलेली, रात्रीचे ९ वाजलेले असावेत. घरी मात्र एकदम जल्लोष सुरू होता, उन्हाळ्याचे
दिवस होते आणि हे दिवस म्हणजे मुली माहेरी राहायला येण्याचे आणि या दिवसात तिची मोठी
नणंद पण बरेच दिवसापासून आलेली. मग सोबत तिचे बच्चे, कुणी ८ मध्ये तर कुणी १२ वि मध्ये
आणि तिचा नवरा असे सगळे आलेले. so घरी सगळ्यांची मस्ती सुरू होती. त्या दिवशी ती प्रचंड
थकलेली, पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे
तिची या अवस्थेत अगदी कुणाला बोलायची इच्छा सुद्धा नव्हती एवढी कंटाळून गेलेली. तिने
सगळ्यांना स्माइल केली आणि फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेली तेवढ्यात सासूने आवाज दिला
" नचिकेता, अग दिवसभर तर नव्हती घरात निदान आत्ता तरी ये बोलायला".
नचिकेता:
"हो हो आले, फ्रेश होतेय"
मग नचिकेता
फ्रेश होऊन हॉल मध्ये गेली.
सासू:
"अग आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो, ते तू पनीर ची भाजी फार छान करतेस ना सगळ्यांना
आवडते तुझ्या हाताची, कर ना आज ती"
नचिकेता:
"अरे तुमची जेवण झाली नाहीत आणखीन? मला वाटल जेवण वगेरे करून तुम्ही गप्पा मारत
बसला आहात"
नणंद:
"अहो नाही वाहिनी तुमचीच वाट पाहत होतो, आज दिवसभर शॉपिंग ला गेलेलो ना मग तिथे
चटर पटर खाल्लो. पण आता जाम भूक लागली आहे, बनवा ना पटकन जेवायला"
नचिकेता:
"ओके, लागते मी तयारीला"
नचिकेताला वाटलेल
की आता घरी जाऊन निवांत खाऊन झोपी जावे पण सगळे उलटे झाले नेहमीप्रमाणे, म्हणजे एरवी
घरी ऑफीस मधून लवकर येणं होत तेव्हा कामाच काही नाही वाटत पण अशावेळी... मग ती स्वयंपाक
घरात गेली आणि पाहते तर काय फक्त भाजी नाही तर सगळा स्वयंपाक राहिलेला. तिने एकटीने
सगळ बनवल आणि रात्री ११ वाजता जेवणं झाली.
As earlier said that she still feels something is missing कारण प्रश्न कधी काम करण्याचा नसतो तर
समजून घेण्याचा असतो.
गोष्ट २:
नुकतीच दिवाळी
झालेली, नंदिनी आणि राज आपापल्या घरी आलेले मुंबईला. परत सगळा दिनक्रम सुरू झालेला
हॉस्पिटल ला जाण येणं . एक ८ दिवसानी घरी फोन झालेला तेव्हा कळालं की राजचे आई-बाबा
मुंबईला येत आहेत काही कामासाठी. खर तर त्याच्या बाबांनी बर्याच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक जागा विकत घेतलेली,
तेव्हा आता त्या जागेवर घर बंधायला सुरू करायच होत. मग एक दोन दिवसांनी ते आले. त्या
सगळ्यांच म्हणजेच राज, त्याचे आई- बाबा आणि त्याची बहीण आणि तिचा नवरा अशा सगळ्यांचं
architect कडे जाण सुरू होत, planning and all. राजची बहीण तिथेच राहते म्हणून ते दोघेपण
(दोघे म्हणजे she and her husband) सगळ्या गोष्टींमधे नेहमी असतात.
ते दोघे तिथे
राहतात म्हणून ते नेहमी प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी असतात पण नंदिनी तिथे घरात असून
पण ती कधीच कुठल्या गोष्टीचा part नसते आणि ही गोष्ट राजच्या आई-वडिलांची आहे आणि त्यांच्या
मध्ये त्यांना जर नंदिनी नको वाटत असेल तर कशाला म्हणून राज उगाच तिला कशात अडकवत नाही
कारण अस उगाच तिला मध्ये आणल्यावरही तिला नेग्लेक्टच केल जात. त्यादिवशी यांनी आर्किटेक्टकडून
प्लान बनवून आणलेला. घरी बसून सगळ्यांची चर्चा सुरू होती. नंदिनी किचन मध्ये आपल आवरत
होती. नंतर ती हॉल मध्ये आली पण कुणीही तिला घराचा प्लान पाहण्यास विचारले नाही. ती
आपापली newspaper वाचत बसलेली. प्लान पाहायलाच नाही बोलावल तर सजेशन मागन तर लांबच.
बर असहि नाही की नंदिनी काही शिकलेली नाही चांगली डॉक्टर आहे आणि शिकलेली नसली तरी
तिला महत्व देण्याची गरज नाही? त्यानंतर घर बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त ठरला आणि
यांच्याकडे कोणताही काम सुरू करण्याआधी पूजा केली जाते त्यामुळे पूजा करायची ठरलेली
आणि प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांनी हेसुद्धा नंदिनीला नाही संगितल. त्याच्या आईच म्हणन
की काय करायचय तिला, तीच तिला हॉस्पिटल मध्ये खूप काम असतात. पण हे तीन ठरवायला हव
होत ना? नाही की ह्यांनी?
गोष्ट ३:
काल मी इंग्लीश
विंग्लिश पिक्चर पाहत होते तेव्हा माझ मन माझ्या भूतकाळात भरकटत गेल आणि मला एका काकूंची
आठवण झाली. नेहमी मला एका गोष्ठीवरुन बर्याच गोष्टी आठवतात आणि मी भरकटते. सवयीप्रमाणे
मी तब्बल ७-८ वर्षे मागे गेले. जे माझ्या आयुष्यातले सगळ्यात सोनेरी दिवस. कॉलेजसाठी
नाही पण माझ्या रूमसाठी ते दिवस मला सोनेरी वाटतात, मी फार छान आणि निवांत राहीले त्या
काळात. मला नाही वाटत तेवढी सुखी मी कधी राहीले असेन. हां तर मुद्दा हा की मला त्या
काकूंची आठवण झाली. तिथे माझ्या घर मालकांच्या त्या शेजारी राहायच्या आणि त्यांची मुलगी
माझी चांगली मैत्रीण होती त्यामुळे माझ नेहमी तिथे जाण असायच. गप्पा टप्पा नेहमी व्हायचा.
त्यांना दोन
मुली, काकू स्वभावाने फार गोड, सतत हसणार्या, सतत फ्रेश, नेहमी मुलींच्या मागे पुढे,
हे हव का ते नको का म्हणजे फरच प्रिय वाटाव्यात अशा. माझ आणि त्यांच फार जमायच. मी
त्यांच्या मुलीला कमी आणि त्यांनाच जास्त बोलायचे. माझी आणि त्यांची फार छान मैत्री
झालेली. पण मला नेहमी एक गोष्ट खटकायची ती ही की त्या मुलांबाबतीत फारच शांत, नम्र
वागनार्या. म्हणजे त्यांच्या मुली त्यांना येता जाता कशाही बोलायच्या कुणासमोरपण आणि
त्या काहीच म्हणायच्या नाहीत फक्त हसायच्या. ते मला अजिबात आवडायच नाही कारण मुलं लहान
असतील तर ठीक आहे पण लग्नाच्या वयाच्या पोरींनी अस सतत टाकून बोलन. मी अस कधीच पाहील
नव्हत एवढ हिडिस फिडीस आणि ते पण शुल्लक गोष्टींवरून? मलाच कधी कधी त्यांना मार द्यावसा
वाटायचा. त्या पोरी बोलल्या की त्या एवढस तोंड करून बसायच्या. मला फार दया यायची त्यांची.
आणि कधी कधी रागपण की का त्या कधी काहीच नाही बोलत?का सतत गप्प बसतात आणि सहन करतात?
बर इथे असही नव्हत की बोलणारी माणसं मोठी आहेत त्या आपल्या पोटच्याच मुली आहेत मग काय
प्रॉब्लेम आहे? त्यामुळे मला अस वाटायच की कधी कधी काही गोष्टी हिसकावून घ्यावाच लागतात
त्या आपोपाप मिळत नाहीत.
या अशा खूप
सार्या गोष्टीआहेत सासू-सुनेच्या, आई-मुलीच्या, बहीण-बहिणीच्या वगेरे. पाहायला गेल
तर नचिकेता काही जास्त expect नाही करतेय एवढच म्हणतेय की मला समजुण घ्या आणि एक सांगू
का जेव्हा एक सून जॉइंट फॅमिली मध्ये राहते तेव्हा नवर्यापेक्षा जास्त तिला सासुच्या
सपोर्ट ची गरज असते. आणि जर सासू कडून सपोर्ट मिळाला तर बाकींच्यांकडून आपोआप सपोर्ट
मिळतो कारण नाही म्हणल तरी घराची डोर ही एका स्त्रीच्या हातातच असते. आणि नंदिनी एक
परकी पोर तुमच्या घरात येते, तुमच्यातली एक तिला करायच असेल तर तिला तुमच्यात सामावून
घेतल पाहिजेच आणि ती आई... ती फक्त दोन गोड शब्द मागतेय बाकी काहीच नाही.
मी तर फक्त
बोलण्या-वागण्याची उदाहरणं दिलियेत, आपण जर समाजात आणखीन खोलवर जाऊन पाहील तर जाळण्या-मारण्यापर्यंतच्या,
स्त्री-भ्रुन हत्येच्या गोष्टी आहेत. कित्येक वेळा यात सासूचा, नणंदेचा, आईचा, सुनेचा
पुढाकार असतो. या सगळ्या गोष्टी पहिल्या की अस वाटत की स्त्रीला रेस्पेक्ट ची गरज जास्त
कुणाकडून आहे? आपण म्हणतो ना की पृथ्वीतलावर फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरूष.
तर आधी एकाच जातितल्या लोकांनी एकमेकांकडे रेस्पेक्टनि पाहण्याची गरज आहे. म्हणजे स्त्री
ने स्त्रीला आधी रेस्पेक्ट दिला पाहिजे राइट? आणि आपण असही म्हणतो ना की ज्या पद्धतीने
आपण स्वतःकडे पाहतो त्या पद्धतीनेच जग पाहत. तर ते इथेपण लागू होऊ शकत. तर तत्पर्य
हे की स्त्रीला आदर हा फक्त पुरुषांनी नाही तर एका स्त्री ने दुसऱ्या स्त्रीलाला पण
देण तितकच गरजेच आहे आणि जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मान देणार नाही तोपर्यंत
तिला पूर्ण इंपॉर्टेन्स प्राप्त होणार नाही.
Happy Women's Day!