नातं
कोणतंही नातं मानन्यावर असत
जमलं तर जमत नाहीतर फसत
आणि मधलं तर कधीच कामाचं नसत
just निभवायचं म्हणून निभावण्यात काहीच अर्थ नसतो
पण तरी आपण कितीतरी वेळा हेच करतो
वेळ साधून नेणं कदाचित आपण यालाच म्हणतो
प्रत्येक फसलेल्या नात्याला काहीतरी background असत
काहीतरी बोलेल किंवा वागलेलं मनात कोपऱ्यात कुठेतरी असत
कारण ते बोलणं बाण बनून मनाला छेडलेलं असत
का असतो माणूस असा , का नाही भरत तो छेद मनाचा
का बनतो तो शब्द अतिमहत्वाच्या
का नेहमी शेमबुड दिसतो दुसऱ्याच्याच नाकाचा
चूक कधीच एकाची नसते
बेरीज कधीच दुसऱ्या अंकाशिवाय होत नसते
आणि टाळी कधीच एका हाताने वाजत नसते
शेवटी काय नातं नको म्हणलं तरी निभाव लागत
म्हणून आपलं मानून राहिलेलं बरं असत
कारण झालं गेलं विसरून राहण सगळ्यासाठी चांगलं असत
- कविता लिहिलेला दिनांक: 10 जून 2017